
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदा धूमधडाक्यात
१30 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदा धूमधडाक्यात होणार आहे. यंदा मूळ मंदिराबाहेर श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येणार आहे.
हेही वाचा: Gold-Silver Price: सोन्याचे दर घसरले तर चांदी झाली महाग, नवे दर जाहीर
दोन वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. विशेष म्हणजे, भव्यदिव्य देखाव्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ओळखला जातो. मंदिर ट्रस्टकडून यंदा "श्री पचंकेदार मंदीर साकारणार" चा देखावा उभारणार आहे.
पंचकेदार मंदिरात बाप्पा विराजमान होणार आहे. कोतवाल चावडी बुधवार पेठ येथे भव्य पचंकेदार मंदीर उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा: रात्रीत ठरली भाजपाची रणनीती; वाटून दिली विधानपरिषदेची जबाबदारी
राज्यातील नव्हेतर देशभरातून भाविक गणेशोत्सवात दगडुशेठ गणपतीची आरास पाहण्यासाठी येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली २ वर्ष गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता.
काय आहे यंदा देखावा?
या वर्षी दगडुशेठ ट्रस्ट कडून भव्य श्री पंचकेदार मंदिर उभारण्यात येणार आहे. हे मंदिर उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित असलेल्या आणि पवित्र असलेल्या भगवान शिवाच्या पंचकेदार मंदिराची तेजस्वी प्रतिकृती आहे. श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १०० फूट लांब, ५० फूट रंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत.
त्यामुळे गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण असेल.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या आज हस्ते पार पडला. शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर म्हणजे पाच सुवर्णी शिखरांचे असून हिमालयातील मंदिर स्थापत्याची प्रतिकृती असेल.
Web Title: Dagdusheth Halwai Ganpati Ganeshotsav 2022 Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..