जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कात्रज - दहीहंडी एकाच दिवशी साजरी होईल. आदल्या दिवशी दहीहंडीसाठी परवानगी दिली जाणार नाही, तसेच जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिला.

दोन सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त होत असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलिस ठाण्यात दहीहंडी मंडळांची बैठक झाली. या वेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, शांतता कमिटीचे सदस्य आणि दहीहंडी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

शेवाळे म्हणाले, ‘‘नियम व कायदे पाळा आणि दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा करा. रुग्णालये, धार्मिक स्थळे व शाळांशेजारी तसेच मुख्य रस्त्यावर दहीहंडीला परवानगी दिली जाणार नाही. स्टेज, मंडप, कमान उभारणीसाठी महापालिका व वाहतूक पोलिसांच्या परवानग्या आवश्‍यक आहेत. वादग्रस्त व राजकीय बॅनरबाजी टाळा, गोविंदा पथकात चौदा वर्षांखालील मुलांचा समावेश करू नका. मंडळ परिसरात वाहतूक कोंडी आणि गोंधळ होऊ नये यांची काळजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. अनुचित प्रकार घडल्यास मंडळालाच जबाबदार धरले जाईल.’’ 

मंडळाच्या वतीने सुनील भोसले आणि सचिन बदक यांनी उत्सवाला गालबोट लागणार नाही, यासाठी नियम व कायदे पाळून दहीहंडी साजरी करू, अशी ग्वाही दिली.

Web Title: Dahihandi Ganeshotsav donation crime