दुग्धउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

दुधाचे दर गडगडले, मात्र पशुखाद्याचे दर वाढले.
dairy farmer
dairy farmerSakal Media

वालचंदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना (dairy farmers)बसला आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या (dairy product) मागणीमध्ये घट झाल्यामुळे दुधाचे दर दोन महिन्यामध्ये लिटरला ६ रुपयांनी कमी झाले आहेत. तर पशुखाद्याच्या (animal feed) कच्या मालाचे दर वाढल्याने पशुखाद्याचे दरामध्ये दोन रुपये किलोने वाढ झाल्याने दुग्ध उत्पादक करणारा शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडला आहे.(dairy farmers in financial crisis).

शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहे. मात्र कोरोनाने गतवर्षी व चालू वर्षी घात केल्याने दुग्धव्यवासाय अडचणणीमध्ये आला आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना १७ ते १८ रुपयांनी दुध तोट्यामध्ये विकावे लागले होते. यावर्षी कोरोना व ब्रेक-द-चेन मुळे दुधाच्या दरामध्ये दोन-तीन महिन्यामध्ये टप्याटप्याने सुमारे ६ रुपयांनी घट झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना २३ ते २५ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. हाच दर फेब्रुवारीच्या सुमारास शेतकऱ्यांना २९ ते ३१ रुपये प्रतिलिटर होता. कोरोनाची दुसऱ्या लाटेमुळे दुग्धव्यवसायाचे गणीत बिघडले आहे.सध्या मॉल, आइस्क्रीम पार्लर, बेकऱ्या, हॉटेल बंद झाल्याने असल्याने दूध व दुग्धउत्पादनाच्या पदाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. तसेच मोठमोठे विवाहसोहळे, स्वागत समारंभ, महाप्रसादाच्या पंगती, मेजवान्या,मंदिरे बंद झाल्याचा फटका ही दुग्ध व्यवसायाला बसला असल्याने दुधाचे दर कमी झाले आहेत.

dairy farmer
पिंपरी शहरातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या संतप्त भावना

तामिळनाडू व कर्नाटकमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दुध पावडर मोफत दिली जात होती. सध्या शाळा बंद असल्यामुळे पावडरची मागणी घटली आहे. दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटल्यामुळे सध्या दुध उत्पादक संस्थाच्या पुढे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या राज्यामध्ये दररोज सुमारे६० लाख लिटर दूध अतिरिक्त असून या दुधाची पावडर निर्मिती केली जात असून देशभरामध्ये दुध पावडरीचे प्रचंड उत्पादन होत आहे. कोरोनामुळे चीन, युरोप, आफ्रिका देशामध्ये होणारी दुध पावडरची निर्यात थंडावली आहेत. तसेच देशामध्ये दुध पावडरचे दर घसरले असून २७० रुपये प्रतिकिलो वरुन १८० रुपये प्रतिकिलो तसेच बटरचे दर ३२५ प्रतिकिलो वरुन २५० रुपये प्रतिकिलो झाले असून दुध पावडर व बटरला मागणी नसल्यामुळे खासगी व सहकारी दुध संघ ही अडचणीमध्ये आले आहेत.

dairy farmer
पुणे महापालिका उभारणार लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल

पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ- एकीकडे दुधाचे दर कमी झाले असून दुसरीकडे पशुखाद्याचे दरामध्ये प्रतिकिला दोन रुपयांची वाढ झाली आहे. सोयबीन,शेंगदाणा, मोहरी, तांदळू ,सुर्यफुल व कापसाच्या बियापासून तेल तयार केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रॉ-मटेरियलपासून ( डीओसी) पशुखाद्य तयार केले जाते. सध्या तेलाचे दर गगणला भिडले असल्यामुळे रॉ-मटेरियलचे दरही वाढले असून पशुखाद्याचे दर वाढले आहे. ५० किलो पशुखाद्याची किंमत १००० ते १३०० रुपये होती.ती ११०० ते १४०० रुपर्यापर्यंत पोहचली असून शेतकऱ्यांनी वाढीव दराने पशुखाद्य घेण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com