धरणक्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे - पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली असून इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सात मंडल क्षेत्रांत पावसाने ओढ दिल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

राज्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली; पण पुणे जिल्ह्यात प्रत्यक्षात पाऊस उशिरा सुरू झाला. पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे शहरासह तालुक्‍यांमध्ये पडलेल्या पावसाचे मंडलनिहाय विश्‍लेषण कृषी विभागातर्फे करण्यात आले. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. 

धरणक्षेत्रात पावसाचा जोर
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील तालुक्‍यांच्या बहुतांश मंडलांमध्ये तेथील सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला. वेल्ह्यातील आंबवणे आणि विंझर मंडल क्षेत्रात ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित भागात दमदार पाऊस बरसला आहे. मुळशीतील तळेगाव मंडल याला काहीसे अपवाद ठरले आहे. तेथे सरासरीच्या २५ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

हवेली ५० टक्‍क्‍यांवर
हवेलीतील कोथरूड, खडकवासला, खेड शिवापूर या मंडल क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला असला तरीही कळस, वाघोली, उरुळी कांचन, थेऊर ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हडपसर येथे ७५ ते १०० टक्के पाऊस पडल्याचेही खात्याने सांगितले आहे.

दुष्काळी तालुक्‍यांना दिलासा
लोणी देवकर (ता. इंदापूर), वरवंड (ता. दौंड), भीमा कोरेगाव, वडगाव रासाई आणि न्हावरा (ता. शिरूर) या मंडल भागात २५ ते ५० टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर तालुक्‍यातील बहुतांश भागात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली. बारामतीमधील लोणी भापकर आणि उंडवडी वगळता सर्वत्र तेथील सरासरीच्या शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. दौंड तालुक्‍यातील पाटस, यवत येथे ५० टक्के; तर, राहू, कोरेगाव अशा मंडल भागात ७५ ते १०० पावसाची नोंद झाली. पुरंदर तालुक्‍यातील राजेवाडी, कुंभारवळण, वाल्हे मंडलमध्ये ५० ते १०० टक्के पाऊस पडला.

Web Title: dam area rain water