निगडीत टोळक्‍याचा धुडगूस

Crime
Crime
पिंपरी - किराणा दुकानदाराने पाण्याच्या बाटल्या फुकट दिल्या नाहीत, म्हणून टोळक्‍याने हातात कोयते घेऊन आरडाओरडा, शिवीगाळ करीत परिसरात दहशत माजवली. काही वाहनांचे नुकसान केले. मात्र, घटनेनंतर आलेल्या पोलिसांनी तक्रारदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निगडीतील पीसीएमसी कॉलनीत घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका किराणा दुकानदाराने पाण्याच्या बाटल्या फुकट दिल्या नाहीत. त्यामुळे 10 ते 15 जणांचे टोळके पीसीएमसी कॉलनीत आले. त्यांनी दुकान बंद करायला लावले. तसेच जाताना काही गाड्यांवर कोयते मारले. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरे बंद करून घेतले. घटनेच्या 15 मिनिटांनंतर आलेल्या पोलिसांनी घटनेची व आरोपींची माहिती घेण्याऐवजी तक्रार कोणी केली, त्याचाच शोध घेत होते. निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस रवींद्र जाधव म्हणाले, 'घटनेची सविस्तर माहिती घेत असून, याप्रकरणी तक्रारदार अद्याप पुढे आलेला नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com