अतिदुर्गम कर्नवडीत घरांना तडे, जमिनीला भेगा

किरण भदे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नसरापूर : रायगड जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या वेल्हे तालुक्‍यातील अतिदुर्गम अशा कर्नवडी गावात काही घरांना तडे गेले असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.

नसरापूर : रायगड जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या वेल्हे तालुक्‍यातील अतिदुर्गम अशा कर्नवडी गावात काही घरांना तडे गेले असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.

या ठिकाणी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी भेट देऊन काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या वेळी ग्रामसेवक एस. एम. राऊत, केळदचे सरपंच रमेश शिंदे उपस्थित होते.

वेल्ह्यापासून पश्‍चिमेकडे पंधरा किलोमीटर केळद (मढेघाट) गाव असून, याठिकाणी वेल्हे तालुक्‍याचा दळणवळणाचा मार्ग संपतो. येथून अतिदुर्गम कर्नवडी येथे पोचण्यासाठी केळद गावापासून अवघड खिंडीतून चार किलोमीटर चालावे लागते. प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले की, येथील जमिनीला लहान लहान भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. काही घरांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. तेथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले असून, याबाबत भूवैज्ञानिकांना घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी बोलविले आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage Homes & Land