खेडच्या पश्चिम पट्ट्यात गारांसह अवकाळी पावसाचे थैमान

विजांच्या लखलखाटात सुमारे तासभर गारांचा पाऊस
Hail storm khed Pune
Hail storm khed PuneMahendra Shinde

कडूस : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. परिसरात विजांच्या लखलखाटात सुमारे तासभर गारांचा पाऊस झाला. यामुळे फुलोऱ्यात आलेल्या बाजरीसह साठवण करून ठेवलेला जनावरांचा चारा, अरणीतील कांदा, शेतातली धना, मेथीसह आंब्याचे नुकसान झाले. दिवसभर उन्हाचा चटका व वातावरणातील गरमीने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आभाळात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली होती. त्यानंतर हलकासा वादळी वारा व टपोऱ्या गारांच्या पावसास सुरवात झाली.

Hail storm khed Pune
पुणेकरांनो, काळजी करू नका! फळे, भाजीपाला मिळणार

कडूस, रानमळा, गारगोटवाडी, कोहिंडे, वाशेरे, वेताळे, सायगाव आदी परिसरात विजांच्या लखलखाटासह सुमारे तासभर पाऊस झाला. रस्त्याच्या कडेची गटारे, खाचखळगे पाण्याने भरले. पिकांच्या एक वेळेच्या पाणी भरणीएवढे शेतात पाणी साठले होते. गारांचा खच साठला होता. अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सायंकाळी सहानंतर संचारबंदी असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ अत्यंत कमी होती, पण शेतकऱ्यांची साठवून ठेवलेली जनावरांची वैरण व अरणीतील कांदा प्लॅस्टिक कागदाने झाकून ठेवण्यासाठी पळापळ झाली. मोकळ्या ठिकाणी बांधलेली जनावरे निवाऱ्याला बांधण्यासाठी पशुपालकांची घाईगडबड झाली.

Hail storm khed Pune
चिंच फोडून बेरोजगारीवर मात; सुप्यात शेकडोंच्या हाताला मिळाले काम

अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यात आलेल्या उन्हाळी बाजरीसह कांद्याच्या अरणीखाली पावसाचे पाणी गेल्याने कांद्याचे नुकसान झाले. गारांच्या माऱ्याने अपरिपक्व आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली. शेतातील कोथिंबीर, मेथीचे नुकसान झाले. जनावरांच्या वैरण भिजल्याने पशुपालकांची नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com