नारायणगाव : अवेळी झालेल्या पावसाचा चारशे एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना फटका

नारायणगाव : अवेळी झालेल्या पावसाचा चारशे एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना फटका

नारायणगाव : नारायणगाव,गुंजाळवाडी, वारुळवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी ४२ मिलिमीटर पाऊस झाला.अवेळी पावसामुळे  परिपक्व अवस्थेतील द्राक्ष घडतील मण्यांना चिरा पडून सुमारे पाचशे एकर क्षेत्रातील जंबो द्राक्ष बागांचे सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने या भागातील द्राक्ष उत्पादक सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत सापडले आहे.

सायंकाळी पाच नंतर नारायणगाव,गुंजाळवाडी, वारुळवाडी परिसरात पाऊस सुरु झाला. आज सकाळ पर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी घडात रात्रभर साठून राहिल्याने पाणी सुटण्याच्या व परिपक्व अवस्थेतील जम्बो द्राक्ष बागांतील घडतील मण्यांना चिरा (क्रॅकिंग) पडल्याचे आज सकाळी दिसून आले.

नारायणगाव, गुंजाळवाडी, वारुळवाडी परिसरात सुमारे पाचशे एकर क्षेत्रातील जम्बो द्राक्षाची काढणी सुरू झाली होती. प्रतवारी नुसार प्रतिकिलो १०० ते १३५ रुपये दराने बांगलादेशातील व्यापाऱ्यांना द्राक्षाचे करार झाले होते. मात्र गुरूवारी झालेल्या एक दिवसाच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती गुंजाळवाडी येथील हरिभाऊ वायकर, जयसिंग वायकर, चंद्रकांत भोर, विकास दरेकर, रोहन पाटे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जयसिंग वायकर यांचे २७ एकर, हरिभाऊ वायकर यांच्या सात एकरमधील तोडणी सुरू झालेल्या द्राक्ष बागेचे कालच्या पावसाने नुकसान झाले. सन २०१७ पासून तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवेळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष बागांचे सतत नुकसान होत असल्याने प्रतिष्ठित समजला जाणारा द्राक्ष बागायतदार कर्ज बाजारी झाला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष आसल्याची भावना व्यक्त होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द्राक्ष बागा वाचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज द्यावे अशी मागणी तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष हरीभाऊ वायकर, सचिव विकास दरेकर, सतीश पाटे यांनी केली आहे.

(संपादन : सागर डी. सागर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com