वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ ॲप

मॉन्सून कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले ‘दामिनी’ ॲप वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Damini App
Damini AppSakal
Summary

मॉन्सून कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले ‘दामिनी’ ॲप वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

पुणे - मॉन्सून कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले ‘दामिनी’ अॅप वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

‘दामिनी’ ॲप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. या वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून नागरिकांना पूर्वसूचना द्यावी.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, लिपिक, महसूल सहायक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना ‘दामिनी’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com