मावळातील धरणांचा विसर्ग केला कमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मावळ तालुक्‍यात होणाऱ्या पावसानुसार धरणातून पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत आहे. तालुक्‍यात रविवारी (ता. 11) दिवसभर पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे सायंकाळी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. 

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात होणाऱ्या पावसानुसार धरणातून पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत आहे. तालुक्‍यात रविवारी (ता. 11) दिवसभर पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे सायंकाळी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. 

चोवीस तासांत रविवारी सकाळी वडगाव येथे 37, तळेगाव दाभाडे 18, कामशेत 105, कार्ला 111, पवनानगर 82, लोणावळा 75, तर शिवणे येथे 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. 10) रात्री जास्त पाऊस झाल्याने सकाळी धरणातील विसर्ग वाढविण्यात आला होता. मात्र, दिवसभर पावसाचा जोर कमी राहिल्याने सायंकाळी विसर्ग कमी करण्यात आला.

पवना धरणातून सकाळी प्रतिसेकंद नऊ हजार 900 क्‍यूसेकपर्यंत वाढविण्यात आलेला विसर्ग सायंकाळी चारनंतर पाच हजार 400 पर्यंत खाली आणण्यात आला. वडिवळे धरणातून प्रतिसेकंद 430 क्‍युसेक, आंद्रा धरणातून प्रतिसेकंद चार हजार 550 क्‍युसेक, ठोकळवाडी धरणातून दोन हजार 300 क्‍युसेक याप्रमाणे विसर्ग सुरू होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dams water flow is reduced in maval