बाणेरच्या डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटसाठी डान्स अन् म्युझिक थेरपी 

dance1.jpg
dance1.jpg

बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. पण कोविडमुळे मानसिकरित्या खचलेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी,  त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी रुग्णांना म्युझिक थेरपी, डान्स थेरपी याचबरोबर प्राणायाम ही  शिकवला जात आहे. जेणेकरून ते या  खचलेल्या मनस्थितीतून बाहेर पडतील यांच्यामधला उत्साह वाढीस लागेल आणि औषध उपचारांबरोबरच या थेरपीचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल,  ते कोरोनावर मात करून लवकरात लवकर बरे होऊन यातून बाहेर पडतील.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेकडून बाणेर येथे उभारण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या 189  रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 172 रुग्ण हे ऑक्सिजन बेडचे आहेत तर 17 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. या ठिकाणी औषधोपचारांबरोबरच कोरोनामुळे मानसिक रित्या खचलेल्या रुग्णांसाठी म्युझिक थेरपी,  डान्स व प्राणायामाचे धडे दिले जात आहेत. ज्या रुग्णांना बेडवरून खाली येता येत नाही. अशा रुग्णांकडून बैठे व्यायाम प्रकार करून घेतले जातात. तर हॉस्पिटलमधील आयसीयू बेड वगळता इतर सर्व रुग्णांकडून सकाळी व संध्याकाळी प्राणायाम,  डान्स थेरपी करून घेतली जाते. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती तर वाढायला मदत होते पण त्याचबरोबर श्वसनाच्या विकारांवरही ते मात करू शकतील. तसेच त्यांच्या फुफुसाची क्षमता  वाढण्यास मदत होत आहे. म्युझिक थेरपीमुळे रुग्णांना मनःशांती मिळण्यास मदत होते. हॉस्पिटलमधील व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले डॉ. भिसे यांनी याकरिता पुढाकार घेतला असून हॉस्पिटल मधील इतर डॉक्टर व नर्स ही यांना या कामी मदत करतात.          

कोरोनामुळे अनेक रुग्ण घाबरलेल्या मनस्थितीत असतात. घरातल्या व्यक्तींनी पासून लांब राहिल्यामुळे त्यांना एकाकीपणा जाणवतो,  यातून बाहेर पडून औषधोपचारांबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढून आपण कोरोनावर मात करू शकतो. हा आत्मविश्वास वाढण्यास मदत होण्यासाठी या थेरपीचा आम्ही या ठिकाणी वापर करतो आहोत.                  

- डॉ. किरण भिसे,  प्रमुख, कोविड हॉस्पिटल, बाणेर


या ठिकाणी आम्ही जे रुग्ण चालू, फिरू शकतात, ज्यांना श्‍वासाला त्रास होत नाहीत अशा रुग्णांना अगदी सोप्या पद्धतीचे  डान्स थेरपीचे व्यायाम प्रकार शिकवत आहोत. यामुळे वॉर्डमध्ये रुग्णांमध्ये उत्साह वाढतो आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे. त्याच बरोबर डान्स थेरपीचा अजून काय सकारात्मक परिणाम होतो याचा अभ्यास ही केला जात आहे.

 डॉ. निकिता मित्तल, डान्स थेरपिस्ट  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com