हा बघा पुण्यातला सर्वांत माेठा खड्डा

dhayari.jpg
dhayari.jpg

पुणे : संततधार पावसामुळे आधीच खड्डेमय झालेल्या पुण्यात रस्त्यांची चाळणच झाली. पुण्यातील नऱ्हे परिसरात 15 फूट रुंदीचा सर्वांत माेठा खड्डा जीवघेणा ठरत आहे.
नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौक, राम मंदिर, झील कॉलेज, अभिनव कॉलेज परिसर, तसेच मानाजीनगर रस्ता, कुटे मळा, गंधर्व हॉटेल चौक, महाराष्ट्र बॅंक तसेच नऱ्हे गावाकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाशेजारील सेवावरील सेल्फी पॉइंट, भैरव नाथ मंदिरादरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात हा पुण्यातील सर्वांत माेठा खड्डा आहे. सुमारे 15 फूट त्याची रुंदी आहे. त्यातून वाहनचालकांना कसरत करत गाड्या हाकाव्या लागत आहेत. स्त्यावरील पावसाचे पाण्याला मार्ग करून देण्यात यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे रस्त्यांचा विस्तार वाढत आहे.

कॅनरा बॅंकेसमोर पावसाचे पाणी तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न वाहनचालक व नागरिक उपस्थित करत आहेत. अभिनव कॉलेज परिसरात रस्ता चिखलमय झाला आहे. येथे ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत आहेत. खड्ड्यांची खोली इतकी आहे की रात्रीच्या वेळी वाहचालकांना लक्षपूर्वक येथून मार्गक्रमण करावे लागते. काही दुचाकीचालक घसरून जखमी झाले आहेत. खड्ड्यांची छोटी छोटी तळी निर्माण झाली आहेत. या भागातील रस्त्यांनी गटारे नसल्याने पावसाळ्यात खड्ड्यांचे प्रकार वाढतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. 

पारी कंपनी चौक, व्येंकटेश शर्विल सोसायटीदरम्यानचा रस्ता ग्रामपंचायत व महापालिकेच्या सीमेवरच आहे; मात्र या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण रखडले आहे. 

अनेक ठिकाणी पावसाळी गटारे करण्याची कामे चालू आहेत. पाऊस उघडल्यानंतर लगेच काम केले जाईल. खड्डे तातडीने बुजवण्यात येतील. 
- बाळासाहेब गावडे, ग्रामविकास अधिकारी, नऱ्हे 

 

पारी कंपनी ते व्येंकटेश शर्विल सोसायटीदरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांत गेला आहे. या रस्त्यावर कायम पाणी साठलेले असते. चालणेदेखील मुश्‍कील झाले आहे. 
सतीश पाटील, नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com