पुणे : अनेक इमारती धोकादायक पण त्या आता करता येईना खाली; कारण...

पुणे : अनेक इमारती धोकादायक पण त्या आता करता येईना खाली; कारण...

भोर (पुणे) : घराच्या आणि इमारतीच्या सभोवताली वेढलेल्या अतिक्रमणांमुळे व अनधिकृत बांधकामांमुळे नगरपालिकेने धोकादायक ठरवून नोटीस दिलेल्या इमारती खाली करता येत नाहीत. त्यामुळे घरमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

नगरपालिकेने हद्दीतील सर्व अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी घरमालक करू लागले आहेत. नगरपालिकेने मागील आठवड्यात शहरातील ५३ घरमालकांना त्यांची घरे व इमारती धोकदायक झाल्याने खाली करण्याच्या, दुरुस्त करण्याच्या किंवा पाडण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यापैकी १८ इमारतींमध्ये कोणीही राहत नाहीत. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला अतिक्रमणे झालेली आहेत. तर उर्वारित काही घरमालकांना घर खाली करण्याची आणि नवीन बांधकाम करण्याची इच्छा आहे. परंतु घराच्या भिंतीलगत झालेल्या अतिक्रमणांमुळे त्यांना घर पाडताही येत नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

घर ५० वर्षांपूर्वीचे असून त्याच्याशेजारील अतिक्रमणे ही सुमारे १० ते १५ वर्षांपासून आहेत. अशा सर्व अतिक्रमणांना महावितरणने वीजपुरवठाही केलेला आहे. त्यामुळे कित्येक वर्षे नगरपालिकेला कुठलाही कर न भरता संबंधित अतिक्रमणधारक राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अशी अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी घरमालक करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही घरमालकांनी आपापल्यापरीने धोकादायक इमारतींची दुरुस्ती सुरु केली आहे. नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने नगरपालिका प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांवर कशा प्रकारे कारवाई करेन, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अतिक्रमणे हटविण्यात येतील...

याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या जुन्या इमारती खाली करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा होत असेल त्या मालकांनी नगरपालिकेकडे रितसर अर्ज करावा. नगरपालिका प्रशासनाकडून त्याची खातरजमा करून तेथील अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तिक्रमणे कितीही जुनी असली तरीही ती काढून टाकण्यात येतील, पंरतु जुन्या घरमालकांना त्याचा त्रास होणार नाही. याची काळजी प्रशासनामार्फत घेतली जाईल, असेही मुख्याधिका-यांनी नमूद केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com