धोकादायक दुभाजकांची आठ दिवसांत दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पुणे - शहरातील सर्व धोकादायक दुभाजकांची दुरुस्ती येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी दिली.

बाणेर रस्त्यावर दुभाजकावर मोटार चढून महिलेसह मुलाचा मृत्यू होण्याची घटना नुकतीच घडली. त्या घटनास्थळाची पाहणी भिमाले यांनी केली. त्यानंतर त्यांनी सहआयुक्त सुरेश जगताप, पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा केली.

‘‘क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील धोकादायक दुभाजकांचे सर्वेक्षण त्या त्या कार्यालयांनी करायचे आहे. तसेच दुभाजकांवर रंगीत पट्टे मारण्याचे काम पूर्ण करण्याबरोबरच धोकादायक दुभाजकांचा अहवालही प्रशासनाला तयार करण्यास सांगण्यात आले आहे,’’ असेही भिमाले यांनी सांगितले.

शहराच्या मध्यभागात जुन्या पद्धतीचे, तर उपनगरांत नव्या पद्धतीचे दुभाजक आहेत. उपनगरांत काही ठिकाणी दुभाजक म्हणून सिमेंटच्या ब्लॉकचा वापर झाला आहे. त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीनुसार आणि गरजेनुसार दुभाजकांची उंची वाढविण्यात येणार आहे. सुमारे दोन ते अडीच फूट उंचीचे ते दुभाजक असतील. त्याचे काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेता, महापालिका

दुभाजकांसाठी तरतूद करणार
शहरातील धोकादायक दुभाजकांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला मोठ्या निधीची तरतूद लागणार असेल तर, स्थायी समितीच्या अर्थसंकल्पातून ती उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही भिमाले यांनी दिली. नागरिकांनीही रस्ता ओलांडताना दुभाजकावरून नव्हे तर, पादचारी मार्गांवरूनच ओलांडावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: dangerous divider repairing in eight days