बाणेर येथील महामार्गाजवळील रस्ता धोकादायक

बाणेर - महामार्गाजवळील वीरभद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.
बाणेर - महामार्गाजवळील वीरभद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

पुणे - बाणेर येथील सदानंद हॉटेलकडून महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने पुढे वीरभद्रनगरकडे जाताना ‘वीरभद्रनगर’कडे असा फलक नाही. याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या बाजूने मोठे सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू असून, या ठिकाणी ‘वाहने हळू चालवा’ किंवा ‘रस्त्याचे काम सुरू आहे’, अशा आशयाचे फलक लावलेले नाहीत. तसेच येथे एकही पथदिवा नसल्यामुळे, या परिसरात अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मुंबई- बंगळूर महामार्गालगत बाणेर हद्दीतील हॉटेल सदानंदजवळील सेवा रस्त्याने पुढे पाषाण- सूस खिंडीकडे जाताना साधारण चारशे मीटर पुढे डावीकडे वळत, हा रस्ता वीरभद्रनगरकडे जातो. या ठिकाणी सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या बाजूला मोठे सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. येथे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. ‘वाहने सावकाश चालवा’, असा कोणताही फलक येथे लावलेला नाही किंवा जिथे काम सुरू आहे तिथे, अवरोधक किंवा बॅरिकेड्‌स लावलेले नाहीत. या भागात एकही पथदिवा नाही, त्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

महामार्गालगत हा सेवा रस्ता असल्याने बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगेकडून पाषाण-सूसकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. महामार्गावरून जाण्याऐवजी, जवळचा रस्ता असल्याने नागरिक याच रस्त्याने जाणे पसंत करतात. तसेच अनेक शाळेच्या बस या ठिकाणाहून ये-जा करतात. असे असताना या ठिकाणी ‘वीरभद्रनगरकडे’ असा फलक लावलेला नाही. त्यामुळे नेमके कुठे वळायचे आहे, हे नागरिकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे रात्री या मार्गाने ये-जा करताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते. कुठे वळायचे आहे, हे लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत नागरिक पुढे जातात आणि मग पुन्हा वळून त्यांना मागे यावे लागते. याठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका संभवतो.

त्याचबरोबर रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून महिलांनी दुचाकीवरून जाणे खूपच जिकिरीचे होत आहे. तरी या ठिकाणी प्रशासनाने संबंधित प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. येथील रहिवासी अमित पवार म्हणाले, की रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजूला लोखंडी किंवा प्लॅस्टिकचे बॅरिकेड्‌स, अवरोधक लावणे गरजेचे आहेत. रस्त्याचे काम चालू नसल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com