हडपसरमधील कालव्यावरील रस्ते होतायेत धोकादायक

manjari.
manjari.

मांजरी - वसाहत व आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कालव्यावरील रस्त्यांचा बकालपणा वाढला आहे. येथे पडणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्याचा तर अडथळ्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

आकाशवाणी-पंधरानंबर येथून वाहत असलेल्या कालव्यालगत दोन्हीही बाजूने मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. हा कचरा थेट कालव्यात उतरत आहे. त्यामुळे कालव्यासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

हडपसर परिसरातून जुना व नवीन असे दोन कालवे गेलेले आहेत. या दोन्हीही कालव्यांलगत विस्तीर्ण झोपडपट्टी वसलेली आहे. पाणी, वीज, रस्ते अशा सुविधा पालिकेकडून पुरविल्या जात आहेत. वाहतुकीसाठी पालिकेकडून कालव्यावरील रस्ते विकसित करण्यात आले आहेत. मात्र, शेजारील वसाहतीमधील काही नागरिकांकडून सध्या कालव्यासह  त्यावरील रस्त्याचेही विद्रुपीकरण केले जात आहे. येथील  शांतीनगर, डवरीनगर, विशाल, जिजामाता आदी वसाहतींच्या परिसरातील कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. तोच कचरा रस्त्यावरही पसरत आहे. त्याची दुर्गंधी सुटली आहे. भटकी कुत्री, डुकरे यांचा वावर वाढला आहे. डास व माशांमुळे आरोगयाचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

कालव्याच्या या रस्त्यांवर काही व्यवसायिक व  नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. थेट रस्त्यावर दगड गोटे, वीटवाळू, फरशा रचून ठेवले आहे. घरातील अडगळीच्या वस्तूंचा ठिकठिकाणी ढीग लावलेला आहे. काही ठिकाणी टपऱ्या, हातगाड्या उभ्या केलेल्या आहेत. जुनी चारचाकी, मोटारसायकल, स्कुटर उभ्या केलेल्या आहेत. सिमेंटमध्ये पक्के चौथरे बांधुन रस्ता अरूंद केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत व जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. 

या वसाहतींच्या परिसरात अशी गंभीर परिस्थिती असतानाही पालिकेचे वसाहत व आरोग्य अधिकारी तिकडे फिरकतही नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कालव्यावरील रस्त्यांची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com