पेट्रोलची नशा करण्यास विरोध केल्याने धायरीत तरुणावर कोयत्याने वार; तरुण जखमी

सिंहगड रस्ता, परिसरातील धायरीत चार पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.
Attack
AttackSakal
Summary

सिंहगड रस्ता, परिसरातील धायरीत चार पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.

धायरी - सिंहगड रस्ता, परिसरातील धायरीत चार पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. इतरांच्या गाड्या मधील पेट्रोल चोरून नशा करताना हटकल्याने त्याचा राग मनात धरून आदेश सुरेश सोनवणे (वय ३०) याला पंधरा दिवसानंतर फिल्मी स्टाईलने सोळा वर्षीय मुलांनी कोयत्याच्या सहाय्याने हातावर व डोक्यात वार करून गंभीर जखमी केले.

या घटनेत आदेश सुरेश सोनावणे (३० वर्षे, रा. मातोश्री निवास, फ्लॅट न. १, पहिला मजला, धारेश्वर मंदिरासमोर, महादेव नगर, धायरी गाव) हा तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश हा घरा शेजारील न्यू हॉटेल समाधान समोर असलेल्या शौकीन पान शॉप शेजारी उभा असताना याप्रकरणी आरोपी असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकासोबत पूर्वी झालेल्या वादा वरुन त्याच्या सोबत आलेल्या ५ साथीदारांनी समोरून चालत येऊन बॅग व कमरेमधून कोयत्या सारखे हत्यार काढून जखमीचे उजवे हाताच्या तळव्यावर तसेच डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे.

या प्रकरणी तीन वीधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन  वीधिसंघर्षग्रस्त बालके फरार आहेत.

या बाबत सिहगड रोड पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आर्म अक्ट ४(२५), म. पो. अ‍ॅक्ट ३७(१) सह १३५, क्रिमिनल लो अमाँडमेंट कलम ७ अन्वये गुन्हा दाख़ल करण्यात आला आहे.

पुढील तपास सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com