भक्ती अॅपमुळे घरबसल्या अष्टविनायक श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जुन्नर - अष्टविनायकापैकी एक श्री क्षेत्र ओझर (ता.जुन्नर) येथे अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून श्री विघ्नहर गणपती देवस्थन ट्रस्टच्या वतीने भक्ती अॅपचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी दिली.
 या भक्ती अॅपमुळे भाविकांना मोबाईलवर घर बसल्या श्रींचे दर्शन, पुजा, अभिषेक, बुकींग, आँनलाईन बुकींग, देणगी तसेच नवसही करता येणार आहेत. 

आमदार शरद सोनवणे, व श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक यांच्या उपस्थीतीत या अँपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेमारू म्युझीक कंपनीच्या सर्वेसर्वा क्रांती गाडा, प्रसन्ना पाटील, विजय कदम, अभिषेक भिलाव उपस्थीत होते.

बदलत्या काळाची गरज ओळखून श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने नविन तंत्रज्ञानाचा वापर करून भाविक भक्तांना अद्यावत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ओझरचा नाव लौकिक जगभरात झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली असल्याचे मत आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Darshan of Ashtavinayak Shri Vignahar Ganapati of the house of Ashtavinayak