दाऱ्या घाटासाठी गडकरींना साकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

जुन्नर - दाऱ्या घाटाच्या कामाच्या प्रश्‍नासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने प्राधान्याने मार्ग काढावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. 
दाऱ्या घाटाचा प्रश्‍न हा तालुक्‍यातील जनतेचा जिव्हाळ्याचा आहे. हा प्रश्‍न धसास लावण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. यात निश्‍चितपणे मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन गडकरी यांनी दिले. तसेच याबाबत गडकरी यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रशासकीय पूर्तता करून घेण्याच्या सूचना आमदार बाळा भेगडे यांना दिल्या. 

लोणावळा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच खासगी दौऱ्यावर आले होते. या वेळी तालुक्‍यातील भाजप कार्यकर्त्यांनी दाऱ्या घाटाबाबत त्यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली. राज्य सरकारने जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केला आहे. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. दाऱ्या घाटमार्गे जुन्नर ते मुंबई हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या मुंबईला माळशेज घाटमार्गे लांबच्या मार्गे वळसा घालून जावे लागते.

तसेच पावसाळ्यात हा मार्ग जोखमीचा बनतो. जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल मुंबईला पाठविला जातो. ही वाहतूक दाऱ्या घाट मार्गे झाल्यास वेळ व वाहतूक खर्चात बचत होणार आहे.

जुन्नरकर नागरिकांची ही जिव्हाळ्याची मागणी आहे. सततच्या पडझडीमुळे माळशेज घाटाच्या दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्ची पडतो. यासाठी सर्वच दृष्टीने दाऱ्या घाट सर्वोत्तम पर्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी डॉ. गंभीरमल कर्नावट, श्‍वेता गोसावी, गणेश बुट्टे, अशोक भोजने, संजय नवले, अमोल शिंदे, अनिल मेहेर, हरीश भवाळकर, बाळासाहेब दुबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन वेळा भूमिपूजन, पण...
आतापर्यंत दोन ते तीन वेळा दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. दोन वेळा भूमिपूजनदेखील करण्यात आले होते. भूमिपूजनाचा नारळ फुटला, परंतु दाऱ्या घाट मात्र फुटला नाही, ही येथील नागरिकांची व्यथा आजही कायम आहे. माळशेज घाट पावसाळ्यात धोकादायक ठरतो. थेट रस्त्यावरच मोठमोठे डोंगरकडे येत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गेल्या काही वर्षात दुर्घटना झाल्या आहेत.

Web Title: darya vally development nitin gadkari