शिरूरच्या ग्रामीण भागात महागाईचे सावट (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

टाकळी हाजी (पुणे): शिरूरच्या ग्रामीण भागात दसरा सणाला महागाईचे सावट दिसून आले. यंदा ग्राहकांमध्ये निरूत्साह दिसला. दुष्काळी सावटामुळे सराफी दुकानावर परिणाम झाल्याचे कवठे येमाई येथील लक्ष्मी ज्वेलर्सचे भूषण निघोजकर यांनी सांगितले.

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक नवीन दुकानांचे उद्‌घाटन झाले. नवीन फ्लॅट व रो हाऊसच्या बांधकामांची भूमिपूजने झाली. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे गावातून श्री मळगंगा देवीची पालखी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्यांची उधळण, फुगड्यांचा खेळ तर मळाबाई छाती की जयच्या जयघोषात कुंड पर्यटनस्थळी ही पालखी पोचली. सोने लुटून सीमोल्लंघन करत ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीचे होमहवन व दसऱ्याच्या पालखी सोहळ्याला भाविकांबरोबर ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. धार्मिक कार्यक्रमांनी येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कान्हूर मेसाई येथील श्री मेसाई देवी मंदिरात दसरा सणानिमित्त भाविकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जांबूत (ता. शिरूर) येथील श्री कळमबंजाई देवीची पालखी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

Web Title: dasara festival and Inflation at shirur taluka