सातशे वर्षांची आतषबाजीची परंपरा

Fire-Show
Fire-Show

पुणे - मोरगाव म्हटले, की अष्टविनायकांपैकी एक गाव, एवढीच ओळख तुम्हाला माहिती असेल; परंतु आणखी एक वेगळी ओळख या गावाची आहे. ती म्हणजे विजयादशमी, अर्थात दसऱ्याला रात्रभर गावात शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. यासाठी लागणारे भुईनळे तयार करण्याची लगबग तेथील कुंभारवाड्यात सुरू झाली आहे. 

दसऱ्यासाठी गावातील घराघरांत शोभेच्या दारूची तयार केली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ही दारू तयार करण्याचे काम हाती घेतले जाते. दारूगोळ्याची आतषबाजी करत येथील मर्दानी दसरा साजरा केला जातो. ही परंपरा सातशे वर्षांपासून गावात जोपासली जात आहे. 

पुणे, मुंबई आणि पंजाब येथून दारूगोळ्यासाठीच्या साहित्याची खरेदी केली जाते. गावाकडून एकत्रित ही खरेदी होते. त्यानंतर त्यांचे घरटी वाटप होते. त्यासाठी घरटी दारूगोळा तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे. हा परवाना फक्त दहा दिवसांसाठी असतो. तो उडविण्यासाठी गावातील कुंभारांकडून भुईनळे तयार करून घेतले जातात. मग घरी बसून त्यात दारू भरली जाते. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण गावात आणि मंदिरासमोर ते उडविले जातात.

गावाचे सरपंच किशोर केदारी म्हणतात, ‘‘दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मोरयाची पालखी रात्री आठ वाजता निघते. त्या वेळी गावकऱ्यांकडून दारूगोळ्याची आतषबाजी केली जाते. सुमारे सातशे-साडसातशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.’’ गावातील ज्येष्ठ किशोर वाघ म्हणाले, ‘‘गावातील सर्वच समाजांतील लोक या उत्सवात सहभागी होतात. सासवड येथील सोनोरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन तोफा या गावाला दिल्या आहेत. मोरयाच्या पालखीपुढे त्यातून आतषबाजी करण्यात येते.

ग्रामप्रदक्षिणेवेळी पालखी ज्यांच्या घरापुढे येते, ते कुटुंबीय घरी तयार केलेल्या दारूगोळ्याची आतषबाजी करतात. दसऱ्याच्या दिवशी रात्री आठ वाजता निघालेली पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मंदिरात येते. तोपर्यंत ही आतषबाजी सुरू असते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com