दसऱ्यामुळे बाजारात ‘चैतन्य’

सदाशिव पेठ - दसऱ्याच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.
सदाशिव पेठ - दसऱ्याच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.

पुणे - गेले सहा महिने मोठी खरेदी केली नव्हती. परंतु सणासुदीचा काळ आल्याने आता इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडलो आहोत. कोरोनाची भीती आहेच; परंतु विक्रेतेही खबरदारी घेत आहेत, त्यामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण होत आहे. दसऱ्यामुळे कपड्यांबरोबर मोबाईल आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ होऊ लागली आहे. फुलांचा बाजारही बहरल्याचे चित्र आहे. दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ फुलू लागल्याने ग्राहक आणि विक्रेत्यांच्या या भावना आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विजयादशमी अर्थात दसरा; साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक. त्यामुळे नवीन वस्तूंची खरेदी, चांगल्या कार्याची सुरुवात या दिवशी करण्याची प्रथा आहेत. टीव्ही, फ्रिज, मोबाईल या वस्तूंबरोबर सोने-चांदी खरेदी केली जाते. 

कोथरूड येथील ज्वेलर्स संजीव गुजर म्हणाले, ‘‘सण असल्याने बाजारात गर्दी होत आहे. ग्राहक स्वत: काळजी घेऊन घराबाहेर पडत आहेत. त्याबरोबर आम्ही व्यापारी देखील ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत. त्यामुळे दिवाळीपर्यंत ७०-८० टक्के व्यवहार सुरळीत होतील.’’

इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते रोहन शहा यांनी सांगितले, ‘‘लॅपटॉप, मोबाईल आणि ॲक्‍सेसरीज खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. घाऊक बाजारातही किरकोळ विक्रेत्यांकडून ऑर्डर मिळू लागल्या असून, व्यवहार 
हळूहळू सुरळीत होत असल्याचे हे निदर्शक आहे.’’

ग्राहक गजानन रच्छेवार म्हणाले, ‘‘गेल्या सहा महिन्यात जीवनावश्‍यक वस्तू वगळता मोठी खरेदी केली नव्हती. आता सण असल्याने ग्राइंडर खरेदीसाठी बाजारपेठेत आलो आहे.’’

गृहसजावटीची धांदल
दसरा म्हणजे शुभकार्याचा शुभारंभ, चैतन्याचा सण. त्यामुळे बाजारातही चैतन्य निर्माण झाले आहे. दसऱ्याच्या दिवशी गृहसजावटीची प्रथा आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपासून मंडई, उपनगरातील बाजारामध्ये फुलांचा बाजार बहरला होता. झंेडू आणि इतर फुलांच्या रंगबिरंगी छटा लक्ष वेधून घेत होत्या. फुलांबरोबर आपट्याच्या पानांची खरेदी-विक्री देखील होत होती. रविवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीपर्यंत फुलांच्या खरेदी-विक्रीत आणखी वाढ होईल, असे एका विक्रेत्याने सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com