डाटा चोरून कंपनीला साडेनऊ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - डाटा चोरून कामगाराने कंपनीची ऑनलाइन साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली.

पुणे - डाटा चोरून कामगाराने कंपनीची ऑनलाइन साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली.

याबाबत रोहन मचे (वय 31, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून याकूब हानिफ शेख (वय 24, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) यास अटक करण्यात आली. याकूब हा सेल लीडर सोल्यूशन या कंपनीमध्ये काही वर्षांपासून काम करत होता. त्याच्याकडे कंपनीच्या डाटा विक्रीची जबाबदारी होती. दरम्यान, त्याने डाटा चोरून कंपनीचे पैसे स्वतःच्या खात्यात वळविले. मचे हे कंपनीच्या डाटा फाइल्सची तपासणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख याला अटक केली. न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: data theft crime

टॅग्स