शिवाजीनगर : शिरोंळेवर दत्ता बहिरट यांची आघाडी | Election Results 2019

Shivajinagar.jpg
Shivajinagar.jpg

Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३०८ मतांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर आहेत. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले आहेत. त्यामुळे यांच्यातील लढत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019 
भाजपने आमदार विजय काळे यांच्याऐवजी शिरोळे यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. भाजपने माजी खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यानंतर, आता अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थला भाजपने विधानसभा निवडणुकीला उमेदवारी दिली. शिवाजीनगर मतदारसंघात आपचे उमेदवार मुकुंद किर्दत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल कुऱ्हाडे हेही निवडणूक लढवित आहेत. 

या मतदारसंघात तीन लाख पाच हजार 587 मतदार आहेत. त्यातील एक लाख 33 हजार 772 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 43. 78 टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे.या मतदारसंघातील औंधमधून 52 टक्के, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरातून 51 टक्के तर गोखलेनगर-जनवाडी परिसरातून 49 टक्के, खडकीतून 48 टक्के मतदान झाले आहे. वस्ती भागातून झालेल्या मतदानाबरोबरच सोसायट्यांमधूनही मतदान चांगल्या प्रकारे झाले आहे. मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार आहेत. त्यामुळे मतविभागणी होण्याची शक्‍यता असून मताधिक्या कोणाच्या पदरात पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com