विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पिंपरी - महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची मंगळवारी (ता. 8) नेमणूक करण्यात आली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे तशी नोंदणी केल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली. 

महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक आहेत. गटनेतेपदी साने यांची नियुक्ती झाल्याने पालिकेतील विरोधी पक्षनेतेही तेच असतील. 

योगेश बहल यांनी शनिवारी (ता. 5) या पदाचा राजीनामा दिल्यानंतर साने यांच्यासह नाना काटे हेही इच्छुक होते. काटे की साने, यावर "राष्ट्रवादी'मध्ये दोन मतप्रवाह होते. अखेर अजित पवार यांनी साने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महापौर नितीन काळजे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिल्यावर अधिकृत घोषणा होईल. 

चिखली प्रभागातून सलग तिसऱ्यांदा साने विजयी झाले. आक्रमक नगरसेवक म्हणून ते परिचित आहेत. आगामी काळात भोसरी विधानसभा मतदारसंघातून "राष्ट्रवादी'च्या वतीने रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी असून, त्यासाठीच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. साने म्हणाले, ""सत्ताधारी भाजपच्या काळात वाढलेल्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करणे हाच मुख्य अजेंडा असेल. राष्ट्रवादीवर नाहक आरोप करून बदनाम करणारा भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणू.'' 

Web Title: Datta Sane opposition leader PCMC