दत्तात्रेय भरणे यांना एकनिष्ठेचे फळ; कारखान्याचे संचालक ते राज्यमंत्री!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे इंदापूर तालुक्यात जल्लोष केला जात आहे.

पुणे : शेतकरी कुंटूबातील आमदार दत्तात्रेय भरणे यांचा राजकीय  घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकत्यापासून सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रेय भरणे पक्षनिष्ठा, पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते आज त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Related image

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. कुंटूबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्‍वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे.

Image result for dattatray bharne ajit pawar hd images

१९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालक पदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्‍न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला.

Related image

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यानंतर २००३ ते २००८ पर्यत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष म्हणून धुरा संभाळली. २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बंडखाेरी करुन निवडणूक लढविली. मात्र निवडणूकीमध्ये थोड्या मतांनी पराभव झाला. २०१२ साली अजित पवार यांनी भरणे यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास सांगून थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षच केले . यानंतर भरणे राजकारणामध्ये मागे वळून पाहिलेच नाही.

Related image

इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर भरणे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली.पाच वर्षामध्ये विराेधी पक्षाचा आमदार असतानाही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले.

Image result for mla dattatray bharne

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र या आमिषाला भरणे बळी पडले नाहीत. त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही.  विकासाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यादां पराभव केला. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.

Related image

नाव- दत्तात्रेय विठोबा भरणे
वय- ५०
मतदार संघ- इंदापूर

शिक्षण- पद् वीधर (बी.कॉम) 
पक्ष- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
राजकीय कारर्किद :-
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक - १९९२ ते 
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष- २००३ ते २००६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक - १९९६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष  - २००१ते २००३ 
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व अध्यक्ष- २०१२ ते २०१४
इंदापूर तालुक्याचे आमदार - २०१४ ते २०१९
इंदापूर तालुक्याचे दुसऱ्यांदा आमदार- २०१९, आता महाराष्ट्राचे राज्यमंत्री

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dattatray Bharne takes oath as minister