दत्तात्रय भोसले यांचा पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरव

रमेश मोरे 
मंगळवार, 5 जून 2018

जुनी सांगवी - येथील कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठान.व राहीमाई प्रतिष्ठान यांच्या वतिने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगवी येथील पर्यावरणप्रेमी दत्तात्रय भोसले यांना पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगवी व परिसरात डबे, टायर यामध्ये झाडे लावून व नदीपरिसरात झाडे लावून ती झाडे त्यांनी जगवली आहेत. श्री.जवाहर ढोरे व दिपक माकर यांचे हस्ते पर्यावरणदिनानिमित्त पर्यावरण मित्र गौरव पुरस्कार व शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. 

यावेळी अमर गायकवाड, नथुराम ढोकळे, पोपटराव भोसले,   संजय मराठे, शिवाजी पाटोळे, अमर नाईक, दिपक माकर, बाळासाहेब सोनवणे, प्रकाश चांदगुडे उपस्थित होते.

जवाहर ढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आज प्रत्यकाने एकतरी झाड लावले पाहिजे तरच देशामध्ये हरितक्रांती होईल. मुलांवर प्रेम करतो त्या प्रमाणे झाडावर प्रेम करावे. भरपूर झाडे लावल्यास आपला परिसर प्रदूषण मुक्त होईल. यावेळी दिपक माकर यांनी पुढीलवर्षी शाळेतील मुलाकडून एक झाड लावून घेण्याची शपथ घेण्याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - प्रविण भोसले यांनी केले.तर आभार संगिता पाचंगे यांनी मानले. 

Web Title: Dattatray Bhosale got Environment Friendly Award