तुम्ही स्वतः कमी करू शकता कार्बन उत्सर्जन; पुण्यातील बाप-लेकीनं तयार केलं ऍप

सम्राट कदम 
Sunday, 3 January 2021

आयपीसीसी ह्या हवामान बदलावर काम करणाऱ्या प्रमुख संस्थेने सांगितले आहे की, तापमान वाढ कमी होण्यासाठी, २०३० पर्यंत जगाचे कार्बन उत्सर्जन निम्मे करणे जरुरीचे आहे.

पुणे : जागतिक हवामान बदलाला कारणीभूत कार्बन उत्सर्जनावरील पुस्तके, चर्चासत्रे, व्याख्याने आणि आंदोलने आपण पाहतो, त्यावर क्षणभर विचारही करतो आणि तिथेच त्या विषयाला तिलांजली देऊन घरी परततो. वैयक्तिक पातळीवर कार्बनचे उत्सर्जन कमी कसे करावे, आपल्या कृतीने काय फरक पडला हे कसे मोजावे ह्यासाठी पुण्यातील प्राची शेवगांवकर या विद्यार्थिनीने वडील प्रशांत शेवगांवकर यांच्या मदतीने Cool The Globe हे ऍप विकसित केले आहे. 

पुणे : मानलेल्या बहिणीला त्रास दिला म्हणून त्याने मित्राचा कापला गळा​

2017 मध्ये पदवीचे शिक्षण घेताना प्राचीला हवामान बदलाबद्दल समजले. एवढंच नाही तर त्याची तीव्रताही तिच्या युवा मनाला भिडली. ती म्हणते, "आयपीसीसी ह्या हवामान बदलावर काम करणाऱ्या प्रमुख संस्थेने सांगितले आहे की, तापमान वाढ कमी होण्यासाठी, २०३० पर्यंत जगाचे कार्बन उत्सर्जन निम्मे करणे जरुरीचे आहे. मग ह्यासाठी माझ्या छोट्याशा वर्तुळामध्ये कसा बदल घडवून आणता येईल याचा विचार सुरू केला. मी आणि बाबांनी कार्बन उत्सर्जन नक्की कशातून होते, किती होते, ते टाळण्याचे उपाय कोणते या सर्वांचा अभ्यास केला. तीन वर्षांच्या आमच्या प्रयत्नानंतर प्रत्यक्ष हे ऍप विकसित झाले आणि विशेष म्हणजे जगभरातील लोकांनी ह्या बद्दलच्या पहिल्याच व्हिडिओला भरभरुन प्रतिसाद दिला. एका आठवड्यात 7000+ लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले.”

पधारो म्हारे देस; उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमण​

असे आहे ऍप -
- वापरकर्त्याला त्याच्या देशाच्या दरडोई उत्सर्जनावर आधारित स्वतःचे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे महिन्याचे टार्गेट दिलेले असते. 
- समजा 10 किलोमीटरवरच्या ऑफिसला जाताना स्वतःच्या कार ऐवजी बसने गेलात, तर ऍप तुम्हाला दाखवेल की 1.9 किलो कार्बन उत्सर्जन वाचले. अशा प्रकारे रोज कोणती कृती टाळल्यामुळे किती कार्बन उत्सर्जन कमी होईल, याची माहिती मिळेल. 
- महिनाभरात तुम्ही निश्‍चित केलेल्या टार्गेटच्या जवळ पोहचलात की नाही हे कळेल. 

'होम मिनिस्टर'चा राग काढण्यासाठी गृहमंत्र्यांची येरवडा जेलमध्ये पैठणी खरेदी​

ऍप कसे डाऊनलोड कराल? 
गुगल प्ले स्टोअर वर Cool The Globe नावाने हे ऍप उपलब्ध आहे.

हे ऍप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

ह्या ऍप संबंधित माहिती आणि चर्चेसाठी Cool The Globe फेसबुक पेजला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Image may contain: text that says "VoLTE 86% Cool The Globe 15:58 Rise for Climate Action Global Mission: Halve C02 Emissions by 2030 Global Meter GHG Savings of All App Users 2021 44 tonne C02eq 500 App Users: 6,973 [Target 10,000] Target Day Earth Day Apr 22 My GHG Savings Jan 35 kg C02eq 220 2021 35 2,640 Reduce your Greenhouse Gas (GHG) Emissionsto target"

प्रत्येकाने हे ऍप वापरून या चळवळीत सहभागी व्हायला हवे. दैनंदिन आयुष्यात छोटेछोटे बदल घडवून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी करण्याची ताकद सामान्य नागरिकांच्या एकजूटीत आहे. 
- प्राची शेवगांवकर, युवा पर्यावरण अभ्यासक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A daughter and her father from Pune has developed an app on how to reduce carbon emissions