आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलीचा आटापिटा; भावूक होत केले मदतीचे आवाहन

समाधान काटे
Tuesday, 27 October 2020

शांताबाईंना ब्रेन ट्युमर असल्यानं डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते. धुनी-भांडी करुन चार मुलींना संभाळणाऱ्या शांताबाईंच्या मुलींनी लोकांकडून हात उसने, कर्जाने पैसे घेऊन मागील वर्षी एक शस्त्रक्रिया केली. आता दुसरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने मुलगी शुभांगी पैशासाठी आटापिटा करत आहे.

पुणे (गोखलेनगर) : "'मागील वर्षी माझ्या आईला अचानक अर्धांगवायूचा झटका आला आणि दावखण्यात घेऊन गेल्यावर ब्रेन ट्यूमर देखील असल्याचं समजलं. आम्ही घरामध्ये चार बहिणी दोन बहिणींची लग्न झाली आहेत. घरामध्ये आता आई शांताबाई, लहान बहिण शारदा व मी शुभांगी तिघीजणी असतो.''असं सांगत होती पुण्यातील जुनी वडारवाडी येथील शुभांगी अलगुडे.

शुभांगी यांची आई शांताबाई अलगुडे (वय ४५ वर्ष) यांना ब्रेन ब्रेन ट्यूमर असल्यानं मागील वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं होतं.या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च पावणे तीन लाख रुपये होता.वडिलांचे छत्र हरपल्याने मुलींनी ओळखीच्या लोकांकडून हात उसणे, कर्जाने पैसे घेऊन शस्रक्रिया केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शस्त्रक्रियेपुर्वी शांताबाई धुणी-भांडी करून आपल्या मुलींना संभाळत होत्या, मात्र मागील वर्षापासून शस्रक्रियेनंतर शांताबाई घरातच असतात. त्यांना आठवड्याला सहाशे ते हजार रुपयांपर्यंत औषधोपचाराचा खर्च आहे. त्यांची मुलगी शुभांगी (वय २३) वर्ष, शिक्षण अकरावी ही लहान मुलांना संभाळण्याचं ( केअर टेकर) म्हणून काम करुन घरखर्च, औषधौपचार इत्यांदी खर्च करते.

डॉक्टरांनी ब्रेन ट्यूमरची दूसरी शास्रक्रिया करण्यासाठी सांगितले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असतांना दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च जवळपास दोन लाखांच्या आसपास असून पुढील काही दिवस औषध उपचारासाठी लागणारा खर्च अफाट आहे. पहिली शस्त्रक्रिया लोकांकडून पैसे घेऊन केली. आता दूसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी तसेच घरखर्च भागवण्यासाठी मुलांना संभाळत असून पैसे जमवण्याची तजवीज करत आहे.

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

"सामजिक कार्यकर्ते  अॅड. मुरलीधर कचरे अपंग कल्याणकारी संस्था, वानवडी यांनी शांताबाई अलगुडे यांच्या आजाराबद्दल मला माहिती दिली. मुकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही शक्य तितकी त्यांना मदत केली आहे. शांताबाईंच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च भरपुर असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करायला हवी"
  - महेंद्र पवार अध्यक्ष मुकेश प्रतीष्ठान वडारवाडी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The daughter struggles for her mother surgery