दौंड : कारवाईची पूर्वसूचना मिळाली अन् वाळूचोर फरार

दौंड शहरात कचरा डेपो परिसर आणि खोरवडी (ता. दौंड) येथे भीमा नदी पात्रात ही कारवाई करण्यात आली.
Crime on Sand Theft Boat
Crime on Sand Theft BoatSakal
Summary

दौंड शहरात कचरा डेपो परिसर आणि खोरवडी (ता. दौंड) येथे भीमा नदी पात्रात ही कारवाई करण्यात आली.

दौंड - दौंड पोलिस (Daund Police) आणि महसूल खात्याने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत (Crime) वाळूचोरीसाठी (Sand Theft) वापरण्यात आलेले १ कोटी रूपये मूल्य असलेल्या २० बोटी (Boat) नष्ट करण्यात आल्या आहेत. परंतु कारवाईची पूर्वसूचना मिळाल्याने महसूल प्रशासन व पोलिसांना कारवाई दरम्यान आणि नंतर एकही वाळूचोर किंवा साधा कर्मचारी देखील हाती लागला नाही.

दौंड शहरात कचरा डेपो परिसर आणि खोरवडी (ता. दौंड) येथे भीमा नदी पात्रात ही कारवाई करण्यात आली. २०१४ पासून या परिसरात यांत्रिक बोटींच्या साह्याने राजरोस वाळूचोरी सुरू आहे परंतु प्रथमच कारवाई संयुक्त कारवाई करण्यात आली. जिलेटीनच्या सहाय्याने एकूण २० यांत्रिक व फायबर बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. दौंड नगरपालिकेचा एक माजी नगरसेवक आणि नगर जिल्ह्यातील गार (ता. श्रीगोंदा) येथील एका वाळूचोराच्या या बोटी होत्या.

सलग आठ वर्षे या पट्ट्यात वाळू चोरून त्याची शहरातूनच वाहतूक केली जात असताना दौंड पोलिस व महसूल प्रशासनाने सोईने दुर्लक्ष केले होते. वाळूचोरांशी हातमिळवणी असलेल्या काही कर्मचार्यांनी अर्थपूर्ण संबंधांमुळे चोरांना कारवाईची पूर्वसूचना दिल्याने वाळूचोर पळून गेल्याने अधिकारी तोंडावर पडले.

तहसीलदार संजय पाटील, उप अधीक्षक राहुल धस, दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्वतः यांत्रिक बोटीत बसून या कारवाईत भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com