दौंडवरून पहाटे पाचला सुटणार पहिली "डीएमयू' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - सुरवातीपासूनच विस्कळित झालेली पुणे- दौंड मार्गावरील "डीएमयू' (डिझेल मल्टिपल युनिट) सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाने नवीन वेळापत्रक तयार केले आहे. पहिली गाडी दौंड स्थानकावरून पहाटे पाच वाजता सोडण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला पाठविला आहे. त्यामुळे "डीएमयू'च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्‍यता आहे. 

"डीएमयू' सेवा सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच या गाडीला अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारीदेखील "डीएमयू'च्या प्रत्येक फेरीला उशीर झाला. इंधन भरण्यासाठी निश्‍चित वेळ नसल्याने अनेकदा उशीर होत आहे. तर, कधी एक्‍स्प्रेस गाड्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी "डीएमयू'ला मागे ठेवण्यात येत असल्याने प्रत्येक फेरीला उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत. 

एकाही गाडीला उशीर झाल्यास "डीएमयू'चे संपूर्ण वेळापत्रक बिघडते. यावर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन वेळापत्रक तयार केले आहे. ते मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्यालयात मान्यतेसाठी पाठविले आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: Daund to escape from five in the morning the first DMU