esakal | रस्ता की मृत्यूचा सापळा ? ; दौंड - कुरकुंभ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था, मोठा अपघात टळला
sakal

बोलून बातमी शोधा

daund-kurkumbh.jpg

 दौंड - कुरकुंभ दरम्यानच्या रस्त्याचे काम संथगतीने चालू असून रस्त्याला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्ता दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्ड्यांमुळे आज ( ता. 19 ) सकाळी कंटेनरमधील लोखंडी खांब अचानक रस्त्यावर पडले.

रस्ता की मृत्यूचा सापळा ? ; दौंड - कुरकुंभ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था, मोठा अपघात टळला

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : दौंड - कुरकुंभ दरम्यानच्या रस्त्याचे काम संथगतीने चालू असून रस्त्याला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्ता दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्ड्यांमुळे आज ( ता. 19 ) सकाळी कंटेनरमधील लोखंडी खांब अचानक रस्त्यावर पडले. मात्र सुदैवाने बाजूने दुचाकी व लहान चारचाकी गाडी नसल्यामुळे मोठा अपघात टळला.

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

दौंड - कुरकुंभ दरम्यानच्या घाटातून बारामतीकडून दौंडकडे लोखंडी खांब घेऊन जाणारा कंटेनर ( आरजे. 48, जीए. 1217  ) खड्ड्यांमध्ये आपटल्याने साखळी तुटून खांब रस्त्यावर पडले. यावेळी कंटेनरच्या बाजूने जाणारी दुचाकी किंवा लहान चारचाकी  नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. हे खांब रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर पडून मोठा अनर्थ झाला असता. खांब रस्त्यावर पडल्याने काही वेळ रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र खांब रस्त्यामध्येच पडून होते. त्यामुळे वारंवार वाहतुकीस अडथळा येत होता.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 दौड - कुरकुंभ दरम्यान वनविभागाची रोपवाटिका व कुरकुंभ घाट परिसरात पडलेल्या खड्यांनी दररोज प्रवास करणारे कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कामाला जाणारे कामगार, परिसरातील नागरिक व इतर प्रवासी जीवमुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खड्डयांमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नसल्याने कामगार, प्रवाशी व नागरिकांकडून नाराजी व संताप व्यक्त होत आहे.