दौंड - नगरची `लाली` ठरली महाएकांकिका 

daund
daund

दौंड (पुणे)  : अभिरंग महाएकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार नगर येथील तुमचं आमचं या संस्थेने सादर केलेली 'लाली'ने पटकावला तर टिटवाळा येथील गंधर्व कलाधारा संस्थेने सादर केलेली 'रेनबोवाला' ही एकांकिका उपविजेती ठरली. परिस्थिती व विविध कारणांमुळे संत्रस्त झालेल्या युवा मनांची स्वप्ने अपूर्ण असतानाही त्यांची जगण्याची प्रबल इच्छा 'लाली' या एकांकिकेत मांडण्यात आली आहे. 

दौंड शहरातील रचना संस्थेने स्वातंत्र्यसैनिक किसनदास कटारिया यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या महाएकांकिका महोत्सवाचे पारितोषिक वितरण लेखक तथा चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते करण्यात आले. रमेश परदेशी, शैलेश पितांबरे, योगेश चापोरकर, डॅा. रवींद्र साठे, सुनील पालकर, सागर जगताप, आदी या वेळी उपस्थित होते. राज काझी यांनी प्रास्ताविक केले. राज्यभरातील विविध स्पर्धांमधील विजेत्या ११ एकांकिकांना या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले होते. 
           
महोत्सवातील प्रयास, प्रतिसाद व प्रतिवाद पुरस्कार अनुक्रमे अफसाना (पुणे), आय अॅग्री (पुणे) व बी अ मॅन (पुणे) या एकांकिकांना देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट लेखन - मंदार इंगळे, दिग्दर्शन - कृष्णा वाळके, नेपथ्य - अविष्कार ठाकूर व रामकिशोर शर्मा, संगीत - शुभम घोडके, नैपुण्य - संकेत जगदाळे, प्रकाशयोजना - अमोघ फडके, उत्कृष्ट अभिनय पुरूष - प्रणव जोशी (आय अॅग्री - पुणे) व हेमंत शिर्के (अफसाना - पुणे), उत्कृष्ट अभिनय - सायली बांदकर (रेनबोवाला - टिटवाळा) व अंजली कदम (बी अ मॅन - पुणे) यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले. 
        
परीक्षक म्हणून पी. डी. कुलकर्णी व शोभा बोल्ली यांनी काम पाहिले. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

प्रथितयश अभिनेत्यांना चित्रपटात घेत नाही 
प्रवीण तरडे या वेळी म्हणाले, 'दौंड मधील एकांकिका महोत्सवात वीस वर्षांपुर्वी माझ्या 'अवगुंठण' या एकांकिकेला अनेक पुरस्कार मिळाली होती. या पुरस्कारांनी मला चित्रपटे करण्याची उर्मी दिली आहे. मी वेगळेच चित्रपट करतो. एकांकिका स्पर्धांमधील विजेतेच हे माझ्या चित्रपटांचे नायक असल्याने मी प्रथितयश अभिनेत्यांना माझ्या चित्रपटात घेत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com