esakal | दौंड पोलिसांनी केली दोन दुकाने सील

बोलून बातमी शोधा

police
दौंड पोलिसांनी केली दोन दुकाने सील
sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : कोरोना(Corona) लाॅकडाऊन(Lock down) काळातील नियमांचे पालन न केल्याने तहसीलदारांच्या आदेशावरून दौंड(Daund) पोलिसांनी शहरातील प्रकाश वुलन्स कपड्याचे दुकान 30 दिवसांसाठी तर ट्राॅली बाॅय सुपर मार्केट हे दुकान 15 दिवसांसाठी सील करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस(Police) निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. तहसीलदारांच्या आदेशावरून पोलिस उपअधीक्षक मयुर भुजबळ यांच्या पथकाने कोरोना लाॅकडाऊन काळातील नियमांचे पालन न केल्याने दौंड (Daund) शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रकाश वुलन्स कंपडयाचे दुकान 30 दिवसांसाठी सील केले. संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकान उघडण्याला बंदी असताना प्रकाश वुलन्स कपड्याच्या दुकानात 50 पेक्षा जास्त ग्राहक(Costumer) एकत्रित येऊन खरेदी करीत होते. त्यामुळे सदर दुकान 30 दिवसांसाठी सील केले. तर शहरातील दौंड - पाटस(Patas) रस्त्यालगत असणारे ट्राॅली बाॅय सुपर मार्केट हे दुकान ठरून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालविले जात असल्याने 15 दिवस सील करण्यात आले.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

पोलिस उपअधीक्षक भुजबळ हे स्व:त ग्राहक म्हणून या सुपर मार्केटमध्ये जाऊन खात्री करून कारवाई केली. पोलिसांनी वारंवार सूचना देऊन व दंडात्मक कारवाई करूनही सदर दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्याने यासंदर्भात तहसीलदारांना लेखी कळविण्यात आले होते. तहसीलदारांच्या आदेशावरून पोलिस व नगरपालिका प्रशासनाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील या प्रतिष्ठीत व्यक्तींच्या दुकानांवरील कारवाईने संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: बारामती पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा