दौंड रेल्वेला साखर वाहतुकीतून १३ कोटी २३ लाखांचे उत्पन्न   

daund.jpg
daund.jpg

दौंड( पुणे) : दौंड रेल्वे स्थानकास ४७८३० टन साखरेच्या वाहतुकीतून सव्वादोन महिन्यात तब्बल १३ कोटी २३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दौंड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन यांनी या बाबत माहिती दिली. 

पुणे व नगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून उत्पादित साखर दौंड रेल्वे स्थानकावरून उत्तर व पूर्व भारतातील विविध रेल्वे स्थानकांवर पाठविली जाते. तेथून ही साखर नेपाळ व भूतान येथे निर्यात केली जाते. रेल्वे मालवाहतुकीच्या एका रेक मध्ये सरासरी ४० ते ४२ वॅगन असतात व एका रेकच्या भाड्यापोटी रेल्वेला अंतरानुसार सुमारे ७५ लाख रूपये मिळतात. परंतु हे रेक सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. दौंड रेल्वे प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यानंतर सोलापूर विभागाचे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा व सहायक व्यवस्थापक व्ही. के. नागर यांनी रेक उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणावर दौंड येथून साखरेची वाहतूक वाढली आहे. १ मे २०१९ ते ९ जुलै २०१९ पर्यंत एकूण ४७८३० टन साखरेची वाहतूक करण्यात आली. १८ रेकच्या एकूण ७५६ वॅगन मधून ही वाहतूक करण्यात आली. 
              
दौंड येथे रेल्वे उड्डाणपुलाजवळ मालधक्का असून तेथे हमाल, वाहतूकदार, सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीच्या मूलभूत सुविधांची वाणवा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. 


दौंड स्थानकाच्या उत्पन्नात भरीव वाढ
दौंड रेल्वे स्थानकास प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, लांब पल्ल्यांचे तिकिटआरक्षण, दंड, आदींद्वारे सरासरी महिन्याला एकूण तीन ते साडेतीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. परंतु मे व जून २०१९ मधील साखरेच्या वाढलेल्या वाहतुकीमुळे एकूण उत्पन्नात भरीव वाढ आहे. 

दौंड रेल्वे स्थानकास मिळालेले एकूण उत्पन्न पुढीलप्रमाणे (कोटी रूपये) : डिसेंबर २०१८ - ३. १ ,जानेवारी २०१९ - ४. ६, फेब्रुवारी - ३.४४, मार्च - ३.३३, एप्रिल - ३. ३९, मे - ९. ६४, जून - ७.९९.

स्थानकाच्या एकूण उत्पन्नाच्या आधारे प्रवासी व मालवाहतूकदारांना सुविधा दिल्या जात असल्याने आगामी काळात दौंड मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com