दावडी खूनप्रकरणी संशयतीला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

राजगुरुनगर - दावडी येथील श्रीनाथ खेसे या युवकाच्या खुनातील संशयित आरोपी अजित कान्हूरकर याला खेड पोलिसांनी मंगळवारी (ता. १२) रात्री जेरबंद केले. बुधवारी खेड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांच्यासमोर त्याला हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

संशयित अजितने श्रीनाथ खेसेचा चालत्या एसटीत खून करून तो पळाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली होती. त्यापैकी खेडचे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलिस हवालदार एस. आर. मांडवे, संदीप भापकर यांच्या पथकाला तो दावडीच्या सातपुतेवस्तीजवळील ओढ्यात लपलेला असताना सापडला. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन रात्री साडेआठच्या सुमारास जेरबंद केले. 

खेड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांच्यासमोर हजर केले. मात्र, कुणीही त्याचे वकीलपत्र न घेतल्यामुळे वकील मिळेपर्यंत त्याला ५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. त्याला सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: davadi murdder case suspected police custody crime