डीसीपी ज्योती प्रिया सिंह यांची दिल्लीतील 'एनआयए'मध्ये बदली 

jyoti.jpg
jyoti.jpg

पुणे : आर्थिक व  सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांची देशातील सुरक्षा संस्थापैकी महत्वाच्या असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी ( एनआयए) मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली येथे चार वर्षासाठी सिंह या प्रतिनियुक्तीवर असणार असून गुरुवारी त्या दिल्ली येथे जाणार आहेत.

आपल्या धाडसी कामातुन वेगळा ठसा उमटविणाऱ्या सिंह या दोन वर्षापूर्वी पुणे पोलिस आयुक्तलयामध्ये पोलिस उपायुक्त म्हणून दाखल झाल्या होत्या. प्रारंभी विशेष शाखेच्या उपायुक्त आणि नंतर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. कॉस्मॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरण किंवा राष्ट्रीय पातळीवर गाजलेले बिटकॉइन प्रकरण त्यांना आतिशय व्यवस्थितपणे हाताळले आहे. याबरोबरच काही दिवसच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्तपद सांभाळताना त्यांनी अनेक मोठ्या व महत्वाचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. 

सिंह या 2008 च्या भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी आहेत. महाराष्ट्रतील नगर सारख्या संवेदनशील जिल्हा त्यांनी हाताळत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तर कोल्हापुर येथे अतिरिक्त अधीक्षकपदी काम करताना त्यांनी रोडरोमीओंना चांगलीच अद्दल घडविली होती. त्यामुळे त्यांची 'लेडी सिंघम' अशी ओळख निर्माण झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com