पुणे : भिडे पूलाजवळ सेल्फी काढताना नदीत वाहून गेलेल्या मुलांचे सापडले मृतदेह

dead bodies found of 2 boys who were swept away by the river near bhide bridge
dead bodies found of 2 boys who were swept away by the river near bhide bridge

पुणे : डेक्कन येथील भिडे पुलाजवळच्या नदीपात्रामध्ये सेल्फी काढताना पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह रविवारी सकाळी आठ वाजता सापडले. महापालिका पुल व संगम पुल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना मृतदेह आढळून आले.

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती. ओंकार तुपधर (वय 18) व सौरभ कांबळे( वय 20, दोघेही रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन ) असे पाण्यात बुडुन मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर व खडकवासला धरण साखळी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने मुठा नदीमध्ये काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली होती. दरम्यान, शहरामध्ये कपडे खरेदी करुन झाल्यानंतर ओंकार, सौरभ व चेतन असे तिघे मित्र भिडे पुल ते ओंकारेश्‍वर मंदिराच्या परिसरात असलेल्या नदीत सोडलेले पाणी पाहण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ओंकार व सौरभ कपडे काढून सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले. त्यावेळी ओंकारचा पाय घसरून तो पाण्यात पडला. तेव्हा सौरभ त्याला वाचविण्यासाठी गेला. त्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. दरम्यान, दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी "एनडीआरएफ'ला पाचारण करण्यात आले.

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​
 

शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळी "एनडीआरएफ'च्या जवानांकडून तरुणांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, रविवारी नदीतील पाणी कमी झाले. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून जवानांनी पुन्हा शोध सुरू केला. त्यावेळी महापालिकेजवळील पुलाखालील एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तर दुसरा तरुणाचा मृतदेह संगम पुलाजवळ सापडला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. 'एनडीआरएफ' जवानांची एक तुकडी आणि कसबा अग्निशमन केंद्राचे 21 जवान या शोधमोहीमेत सहभागी झाल्याचे अग्निशमन अधिकारी सुनील नाईकनवरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com