पुणे महापालिकेजवळ अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

महापालिकेजवळील शिवाजी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. संबंधित व्यक्तिचा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला आहे. 

पुणे : महापालिकेजवलील शिवाजी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. संबंधित व्यक्तिचा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला आहे. 

सूजन मंडल (वय 25) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता महापालिकेजवळील शिवाजी पुलाच्या खालील कठड्यावर एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस घटनास्थली दाखल झाले. त्यांनी तरुणास रुग्णलयात दाखल केले, मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिस याबाबत तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dead body found near PMC