पुणे : पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा अद्याप पत्ता नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

वाघोली (पुणे) : येथील भैरवनाथ तळ्यात बुडालेल्या रोहिणी पाटोळे या महिलेचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. पीएमआरडीएच्या अग्निशमन पथकाने रात्री 11 वाजेपर्यंत शोध घेतला. आज दुपारनंतर ते पथक पुन्हा शोध घेणार आहे. दरम्यान बुडालेल्या घटनेतील दत्तात्रय जाधव यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी दुपारी रोहिणी पाटोळे या तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा मुलगा स्वप्नील ही तेथे आला. तो खेळताना पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी रोहिणी यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र दोघेही बुडू लागल्याने समोर भैरवनाथ मंदिराच्या बाजूने असणाऱ्या दत्तात्रय जाधव यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने तिघेही बुडाले.

ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पीएमआरडीएच्या अग्निशमन पथकाला घटनेनंतर दोन तासात दत्तात्रय यांचा तर सहा तासांनी स्वप्नील याचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र रोहिणी यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body of mother and son still not found in wagholi