डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : भावे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी 
संशयीत आरोपी विक्रम भावे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी 
संशयीत आरोपी विक्रम भावे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला. तपास प्रगती पथावर असून पुरावे आणि इतर तपासासाठी वेळ आवश्यक असल्याने न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. भावे याच्या अटकेला 23 ऑगस्टला 90 दिवस पूर्ण झाले. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सिबीआय आणि सरकारी वकिलांनी केली होती. भावे याचा जामीन अर्ज शनिवारी (ता.17) न्यायालयाने फेटाळला आहे. तर, यापूर्वी वकील संजीव पुनाळेकर यांना जमीन देण्यात आला आहे. 

अॅड पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणी आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यात शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, असा दावा सीबीआयने केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline increased for file charge against Vikram Bhave