लपाछपी खेळताना पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

पुणे : उन्हाळा सुट्टीमुळे मित्रासमवेत रात्री लपाछपा खेळत असताना काम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना कात्रजमधील भिलारवाडी येथे 7 मेला घडली.

पुणे : उन्हाळा सुट्टीमुळे मित्रासमवेत रात्री लपाछपा खेळत असताना काम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कात्रजमधील भिलारवाडी येथे 7 मेला घडली.

स्वराज माधव खवले (वय 11, रा.भिलारवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
 

पोलिस उपनिरीक्षक सुबाराव लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज्य हा इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. उन्हाळाची सुट्टी लागल्याने स्वराज व त्याचे मित्र घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी खेळायला जात होते. नेहमीप्रमाणे स्वराज व त्याचे मित्र 7 मेला सायंकाळी सात वाजता बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी लपाछपी खेळण्यास गेले. स्वराजवर राज्य आले, त्यामुळे तो लपण्यासाठी गेला. अंधार असल्याने त्यास पाण्याच्या टाकी लक्षात आली नाही. टाकीवर झाकण नसल्यामुळे तो पाण्यात पडला. त्याच्या मित्रानी तत्काळ घरच्यांना सांगितले, त्यानंतर त्यांनी स्वराज यास पाण्यातुन बाहेर काढले, दवाखान्यात नेले, मात्र उपचार सुरु असताना दोन तासांनी त्याचा मृत्यु झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of an 11-year-old boy falling into a water tank while playing a hide and Sick