पाण्याच्या टाकीत पडुन लहानग्याचा मृत्यू

प्रा. प्रशांत चवरे
बुधवार, 4 जुलै 2018

भिगवण : तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथे घराजवळील पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दीड वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. समर्थ गणेश जराड (रा. तक्रारवाडी, ता.इंदापुर) असे टाकीमध्ये पडुन मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहीती अशी, समर्थ जराड हा लहान मुलगा बुधवारी(ता.4) सकाळी आठच्या सुमारास घराच्या शेजारी खेळत होता. 

त्यानंतर तो घऱातील इतर सदस्यांची नजर चुकवून घराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. घरातील सदस्यांनी त्याची इतरत्र शोधाशोध केली परंतु मिळुन न आल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये पाहिले असता तो टाकीमध्ये आढळुन आला. त्यास खासगी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: The death of the child falls into the tank

टॅग्स