संशयित डेंगी आजाराने कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा मृत्यू 

Death of Executive Engineer Jeevan Gaikwad because Dengue Disease
Death of Executive Engineer Jeevan Gaikwad because Dengue Disease

पिंपरी : महापालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड (वय-57, रा. विशालनगर, पिंपळेनिलख) यांचा बुधवारी (ता. 3) झालेला मृत्यू हा संशयित डेंगी आजाराने झालेला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डेंगीसंदर्भात अहवाल तपासला असता तो निगेटिव्ह आढळला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयाकडून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी गुरुवारी दिली. 

दरम्यान, याबाबतचा अहवाल आणि कागदपत्रे आरोग्य सेवा उपसंचालकांकडे पाठविण्यात येतील. त्यानंतरच, त्यांचा मृत्यू डेंगीने झाला आहे का, हे अधिकृतपणे स्पष्ट होईल, असे डॉ. साळवे यांनी नमूद केले. गायकवाड यांना 26 तारखेला पिंपळेनिलख-विशालनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर, त्यांना 28 तारखेला औंध येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तर, 1 ऑक्‍टोबरला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच दिवसापासून ते व्हेंटीलेटरवर होते. बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 
डॉ. साळवे म्हणाले, "डेंगीबाबत आवश्‍यक उपाययोजना म्हणून पिंपळेगुरव-विशालनगर परिसरातील 500 घरांचे कंटेनर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याशिवाय, परिसरामध्ये आवश्‍यक औषध फवारणी करण्यास सांगितले आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com