शिकाऱ्याच्‍या फास्‍यात अडकुन बिबटयाचा मृत्‍यु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

माले : मुळशी धरण परिसरातील विसाघर (ता.मुळशी) गावात बिबटया मृतावस्‍थेत आढळला. अॅम्बी व्‍हॅलीच्‍या परिसरातील विसाघर व देवघर गावच्‍या शिवेवर शनिवारी (ता.१)  बिबटया मृतावस्‍थेत दिसून आला. शिकाऱ्याच्‍या फास्‍यात अडकुन बिबटयाचा मृत्‍यु झाल्‍याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. अॅम्बी व्‍हॅलीसारख्‍या परिसरात शिकारीची ही घटना समोर आल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

वाहनाच्‍या क्‍लच केबलसारख्‍या तारेचा वापर करुन फासा तयार करण्‍यात आला आहे. या फास्‍यात अडकल्‍यानंतर प्राणी सुटण्‍यासाठी जेवढी धडपड करेल, ताकद लावेल तेंवढया ताकदीने फास करकचुन आवळत जातो. तारेच्‍या केबलमुळे प्राण्‍यांना जखमा होतात. असाच फास बिबटयाच्‍या पोटाला मागच्‍या पायांच्‍या जवळ लागल्‍याचे दिसून येत आहे. त्‍याने सुटण्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्‍नांमुळे पोटाजवळ मोठया जखमाही झाल्‍या आहेत. शनिवारी (ता.१) संध्‍याकाळी हा प्रकार कामगारांच्‍या लक्षात आला. त्‍यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्‍थळी भेट देऊन पंचनामा व तपास करण्‍याची पुढील प्रक्रिया सुरु केली आहे. 

जवळीलच शिरवली, चांदिवली, वळणे परिसरात बिबटयांच्‍या जोडीचे गेल्‍या वर्षाभरापासून वावर दिसून येत होता. मुळशी धरणाच्‍या परिसरात दाट जंगल, पाणी, पशु, पक्षी आहेत. विविध प्राण्‍यांचा वावर आहे. रानडुक्‍कर,मोर, हरीण यांच्‍या शिकारीची कुजबुज ग्रामस्‍थांमध्‍ये अधुनमधुन असते. परंतू आता शिकाऱ्यांच्‍या फास्‍यात बिबटया अडकुन झालेल्‍या बिबटयाच्‍या मृत्‍युमुळे धरण परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: The death of the leopard caught in net of Hunter