स्वाइन फ्लूमुळे आणखी एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - शहरात स्वाइन फ्लूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या दोन झाली असून, हे दोन्ही रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. एकाच आठवड्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा मृत्यू आहे.

कमी-जास्त होणाऱ्या थंडीमुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच १ एन १’ या विषाणूंचा संसर्ग वेगाने वाढत आहे. थंडीचे वातावरण या विषाणूंच्या फैलावासाठी पोषक असल्याने स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

शहरातील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदान झालेल्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका रुग्णाला कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आली आहे. दुसऱ्या एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

वेगवेगळ्या रुग्णालयांमधून स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या ३० हजार १५६ रुग्णांना तपासण्यात आले आहे. त्यापैकी २१२ रुग्णांना टॅमी फ्लू हे स्वाइन 
फ्लूवरील औषध दिले आहे. आज केलेल्या ४२ पैकी १३ रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने घेतले आहेत, असेही महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

Web Title: death by swine flu