भोसरीत पोहण्याच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

संदीप घिसे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : पोहण्यात तरबेज असलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भोसरी येथील महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये आज (गुरुवार) दुपारी घडली.

पिंपरी (पुणे) : पोहण्यात तरबेज असलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भोसरी येथील महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये आज (गुरुवार) दुपारी घडली.

सनी बाळासाहेब ढगे (वय २९, रा. लांडगे आळी, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचा जलतरण तलाव आहे. या तलावामध्ये पोहत असताना अभिषेक ढगे या तरुणाला कोणीतरी पाण्यामध्ये तळाशी असल्याचे एका नागरिकाने सांगितले. त्यानुसार अभिषेक यांनी बुडलेल्या तरुणाला वर काढले असता तो आपला चुलत भाऊ सनी असल्याचे दिसून आले. सनी यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आज दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. त्यावेळी तलावावर गर्दीही नव्हती, असे असताना महापालिकेचे जीवरक्षक कुठे गेले होते, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सम्राट फुगे यांनी उपस्थित केला.

Web Title: The death of youth by Swimming pool in bhosari