उपचारासाठी दाखल केलेल्या अज्ञात तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पिंपरी  - तारीख २ मे....वेळ सायंकाळी साडेसातची...एका अत्यवस्थ तरुणाला काही जण रुग्णालयात घेऊन येतात....डॉक्‍टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगतात....हे समजताच त्याला घेऊन येणारे लोक मृतदेह तिथेच सोडून पळ काढतात....त्यामुळे बेवारस मृतदेह शवागृहात पडून राहतो.

बुधवारी सायंकाळी वायसीएम रुग्णालयातील सीएमओ रेल्वे अपघातातील दोन रुग्णांवर उपचार करीत होते. त्या वेळी काही जण एका २५ वर्षीय तरुणाला घेऊन आले. डॉक्‍टरांनी त्याला कॉटवर झोपविण्यास सांगितले. दोन रुग्णांवर उपचार केल्यानंतर डॉक्‍टरांनी त्या तरुणाची विचारपूस केली. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्‍टरांनी त्याला घेऊन आलेल्यांचा शोध घेतला. मात्र, ते तिथून गायब झाल्याचे दिसून आले. डॉक्‍टरांनी अखेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तरुणांच्या कपड्यांची झडती घेतली असता, त्यात ४५ रुपये मिळाले. मात्र, ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. शवविच्छेदन अहवालात कावीळमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

सीसी टीव्ही कॅमेरे बंद
वायसीएम रुग्णालय आणि परिसरात ४८ सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. मृत्यू झालेल्या तरुणासोबत कोण आले होते, हे पाहण्यासाठी पोलिस सीसी कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्यासाठी गेले. तेथील एकाही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग होत नसल्याचे समोर आले. याबाबत संबंधितांना कळविल्याची सारवासारव सुरक्षा विभागाने केली.

Web Title: Death of youth YCM hospital