डेबिट कार्डचे क्‍लोन करणारे अटकेत

डेबिट कार्डचे क्‍लोन करणारे अटकेत

पुणे - कॅम्पमधील पेट्रोल पंपावर काम करताना पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चालकांच्या डेबिट कार्डचे क्‍लोन तयार करून त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली.

जुल्फीकार अहमद हुसेन (वय २१, रा. सिमला, जि. मालदा), मिथुन अली (वय २७), नोयन सादिक शेख (वय २३) आणि सईमुद्दीन अली (वय २०, तिघेही  रा. गौरीपूर, जि. मालदा), अशी त्यांची नावे आहेत. सर्व आरोपी पश्‍चिम बंगालचे आहेत. सध्या ते वडगाव शेरीत राहात होते. 

फारुख नजीर शेख (वय ४२, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली. शेख हे नऊ जानेवारीला संबंधित पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. कार्डद्वारे पैसे भरताना आरोपींनी त्यांचे कार्ड क्‍लोन केले. त्यानंतर कार्डद्वारे नऊ हजार रुपये काढून घेतले. अन्य ग्राहकांच्या डेबिट कार्डचा डेटा क्‍लोन करून घेत आणि पिन नंबरची नोंद करून ते घेत होते. याचा वापर करून ग्राहकांच्या खात्यावरून पैसे काढून घेत होते. तसेच आरोपींनी काही कार्ड क्‍लोन केले व काही डेटा इतर साथीदारांना विकला आहे. 

कार्ड क्‍लोन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आरोपींकडून जप्त करायचे आहे, ही टोळी परराज्यातील आहे, अन्य कोणाची फसवणूक त्यांनी केली आहे का? याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून २४ जानेवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com