बारामतीतील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

सून गेल्या चार पाच वर्षापासून संधिवाताने आजारी असल्याने, त्यांचा वैद्यकीय खर्च झेपत नव्हता. मुलाला नोकरी नाही. बेरोजगारीमुळे त्यांच्या आर्थिक अडणीत आणखी भर पडली होती. यामुळे हिवरकर यांनी राहत्या घरी आज (बुधवार) पहाटे गळफास लावून आत्महत्या केली.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील काशिनाथ सिधू हिवरकर या 60 वर्षीय शेतकरयाने गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून हिवरकर यांनी आत्महत्या केली.

हिवरकर यांच्यावर शिर्सुफळ विकास सोसायटीचे 1 लाख 75 हजार रुपयांच्या कर्जाचा बोजा होता. तसेच, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. याबरोबरच त्यांची सून गेल्या चार पाच वर्षापासून संधिवाताने आजारी असल्याने, त्यांचा वैद्यकीय खर्च झेपत नव्हता. मुलाला नोकरी नाही. बेरोजगारीमुळे त्यांच्या आर्थिक अडणीत आणखी भर पडली होती. यामुळे हिवरकर यांनी राहत्या घरी आज (बुधवार) पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ करण्यात यावीत, तसेच शेतपंपांची विजबिले माफ करावीत या मागण्यांसाठी सध्या राज्यभरात संघर्षयात्रा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा चर्चेत आला असून, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आले आहेत. 

Web Title: debt ridden farmer commits suicide in baramati